वैदर्भीय कादंबरी-ग्रामीण जीवनाची कथा
DOI:
https://doi.org/10.7492/n2mbqw07Abstract
वैदर्भीय ग्रामीण कादंबरीचा विचार, हा ग्रामीण जीवनाची वास्तविकता राजकीय, सामाजिक, आर्थिक, समस्यांना झुंज देत, जगले जाणारे जीवन हेच ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण, वैदर्भीय ग्रामीण कादंबरीच्या माध्यमातून अभ्यासनीय ठरते. १८८५ ते १९३० हा कादंबरी लेखनाचा पहिला टप्पा, तर १९३० नंतरचा काळ हा कादंबरी लेखनाचा दुसरा टप्पा म्हणून ओळखला जातो. १९४५ पासून १९६० सालापर्यंत कादंबरी लेखन जोमाने वाढू शकले नाही. परंतु १९६० साली उद्धव शेळके यांच्या “धग” या कादंबरीतून ग्रामीण जीवन जगणाऱ्या जनतेचे हुबेहूब चित्र रंगवले गेले. ग्रामीण कादंबरी म्हणजे “धगधगत्या ग्रामीण समाजाचे भेदक चित्रण होय” शेतकऱ्यांच्या समस्येत “आधी पेरले तर पिकत नाही, आणि पिकले तर विकत नाही” अशा “अस्मानी व सुलतानी” गर्तेत शेतकऱ्याला सैरभैर करून सोडते. ग्रामीण जीवनातील वास्तवता ही शहरी आणि ग्रामीण या दोहोंच्या मध्ये शिक्षण व्यवस्थेने फार मोठी दरी निर्माण केली. “विषमता” नावाचा रोग औद्योगिक भरभराटीत ग्रामीण जीवनाच्या मागे-पुढे भेडसावू लागला. ग्रामीण जीवनाच्या माध्यमातून कादंबरीतून ग्रामीण लेखकांचे, कादंबरीकारांचे, समीक्षकांचे, असणारे योगदान हेच ग्रामीण जीवनाचे जागृत वास्तव आहे.