विज्ञान प्रयोग आणि विद्यार्थी शालेय जीवनातील महत्त्व: एक अवलोकन
DOI:
https://doi.org/10.7492/hcdtdc40Abstract
विज्ञानातील विविध मूलभूत संकल्पना उत्तम प्रकारे समजण्यासाठी विविध प्रयोग करणे अथवा किमान निरीक्षण करणे आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती बघता आजही अनेक शाळांमध्ये चांगल्या प्रयोगशाळा आणि पुरेस प्रयोग साहित्य नाही. त्यामुळे विद्यार्थी स्वतःच्या हाताने प्रयोग करण्यापासून वंचित राहतात. त्यासाठी प्रत्येक विज्ञान शिक्षक हा स्वतः प्रयोगशील असला तरच तो मुलांमध्ये विज्ञानाची आणि पर्यायाने प्रयोग करण्याची आवड निर्माण करू शकेल. नाविन्यपूर्ण प्रयोग करायचे तर प्रत्येक शाळेमध्ये एकतरी छोटी कार्यशाळा असणे आवश्यक आहे. जिथे विविध प्रकारची उपकरणे, हत्यारे, छोटी यंत्रे असतील आणि ती सर्वांना वापरता येतील, यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगाची आवड निर्माण करणे हे प्रत्येक विज्ञान शिक्षकाचे प्रथम कर्तव्य आहे आणि या कामात त्यांना पालकांनीही सहकार्य करायला हवे बरेच विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनात कायम तेच तेच प्रयोग मांडतात. तसेच प्रकल्पसुद्धा अगदी चाकोरीबद्ध असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन करणे विज्ञान शिक्षकांचे काम आहे.