बुढाई कादंबरीतील भाषाशैली
DOI:
https://doi.org/10.7492/7g08n323Abstract
‘बुढाई’ ही डॉ. प्रतिमा इंगोले यांची साहित्यकृती आहे. वऱ्हाडी भाषा कादंबरीतून लेखिकेने वऱ्हाडी बोली भाषेचे वैभव वर्णन केले आहे. ‘‘बुढाई कादंबरीतील भाषाशैली’’ हा विषय या प्रस्तुत शोध निबंधातून मांडलेला आहे. प्रतिमा इंगोले यांच्या एकूणच साहित्य प्रकाराचे विवेचन करताना असे लक्षात येते की, त्यांच्या कथा, कादंबरी, कविता, नाट्याछटा, बालवाङ्मय ह्या सर्वच लेखनामध्ये मराठी भाषेमुळे वाचनीयता निर्माण होऊन वाचकांच्या मनाची पकड घेते. ‘‘उत्कंठा, हुरहुर आणि जिज्ञासा वाढविणारे कथानक फुलविण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. पारंपारिक पद्धतीने तपशील मांडत तटस्थपणे निवेदन करून निवेदनाला पुरक भाषा आहे.1 त्यांनी या कादंबरीत निवेदनासाठी वऱ्हाडी भाषेचा वापर केल्यामुळे वातावरणनिर्मिती करणे त्यांना सहज शक्य झाले. ग्रामीण परिसरातील ग्रामीण बोलीचा वापर असलेल्या खुमासदार चित्रमय शैलीने प्रादेशिक वातावरण निर्मितीला मदत झाली आहे. भाषा ही दर बारा कोसावर बदलणारी असते असे म्हणतात. ग्रामीण साहित्यात परिवर्तने झाली ती 1980 नंतरच झाली. साहित्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. नविन विचारांमुळे नवे प्रवाह निर्माण झाले. संवेदनशील मने अंतर्मुख होवून सृजनशील, संवेदनशील तरूण मने आपले जीवनानुभव शब्दांकित करू लागले. ग्रामीण खेडूताकडे कधी गांभीर्याने न पाहिल्याने ग्रामीण समाजाबद्दल तुच्छतेची भावना उच्चवर्णीयांची होती, त्यामुळे आपल्या समाजासाठी आपण लेखणी घ्यावी ही भावना निर्माण होवून संघर्ष सुरू झाला. त्यात आपली भाषा गावंढळ अशी आहे का? अशी खंत मनाला बोचत असलेले संवेदनशील लेखक आनंद यादव, शंकरराव खरात, चंद्रकुमार नलगे, बाबा पाटील, मधुमंगेश कर्णीक, रा.र. बोराडे इ. चे साहित्य ग्रामीण वास्तव चित्रित करू लागले. निवेदनासाठी बोलीचा वापर केला जाऊ लागला. हाच आदर्श घेत बाबाराव मुसळे, प्रतिमा इंगोले, रविंद्र शोभणे, सदानंद देशमुख, किशोर सानप, सुखदेव ढाकणे इ. लेखक आपल्या स्वजाणीवा स्वभाषेतून व्यक्त करू लागले.