चंद्रपूर जिल्हयातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्थितीचे चिकित्सक अध्ययन

Authors

  • किशोर गुरुदास हुमने Author

DOI:

https://doi.org/10.7492/wczshg68

Abstract

         भारतातील ग्रामीण आणि उपेक्षित समुदायांना, विशेषतः महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात, शिक्षण देण्यात जिल्हा परिषद (ZP) प्राथमिक शाळा महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व असूनही, या शाळांना त्यांच्या कार्यक्षमता आणि शैक्षणिक निकालांवर परिणाम करणाऱ्या असंख्य आव्हानांना तोंड द्यावे लागते. प्रस्तुत संशोधनकार्यात चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या स्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. संशोधनात प्राथमिक (क्षेत्र सर्वेक्षण व शिक्षकांच्या मुलाखती) आणि दुय्यम स्रोतांद्वारे (सरकारी अहवाल, शैक्षणिक सर्वेक्षण) आवश्यक ती माहिती संकलित काण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या माहितीचे सांख्यकिय विश्लेषण SPSS 18.0 या सॉफ्टवेअरच्या माध्यमातुन करण्यात आले. प्राप्त झालेल्या परिणमांवरून असे निदर्शनास आले की चंद्रपूरमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध उपक्रमांची आवश्यकता आहे. संशोधनात प्राप्त परिणामांवरून असे निदर्शनास येते की बहुतांश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पक्क्या इमारतीत आहेत, परंतु बहुतांश शाळांमधे सर्व वर्गांसाठी पुरेशा वर्ग खोल्या, पुरेसे फर्निचर,  व विद्यार्थ्यांसाठी पर्याप्त शौचालये नाही.

चंद्रपूर जिल्हयातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्थितीचे चिकित्सक अध्ययन

किशोर गुरुदास हुमने

Downloads

Published

2011-2025

Issue

Section

Articles