चंद्रपूर जिल्हयातील आदिवासींच्या आर्थिक स्थितीचे चिकित्सक अध्ययन
DOI:
https://doi.org/10.7492/aq9p9m10Abstract
भारतातील आदिवासी समुदायांची आर्थिक स्थिती त्यांच्या ऐतिहासिक उपेक्षिततेमुळे आणि सततच्या सामाजिक-आर्थिक आव्हानांमुळे एक महत्त्वाचा विषय राहिली आहे. प्रस्तुत संशोधनकार्यात चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात आदिवासींच्या आर्थिक स्थिती संबंधित महत्वपूर्ण असणाऱ्या प्रमुख घटकांशी संबंधित शोध घेण्यात आला आहे. प्राथमिक माहिती सर्वेक्षण आणि मुलाखतीद्वारे प्राप्त करण्यात आली आहे. हे संशोधन चंद्रपूरमधील आदिवासी समुदायातील जनतेला भेडसावणाऱ्या असमानतेवर प्रकाश टाकतो. प्रस्तुत संशोधनकार्यात संभाव्यता पद्धतीतील साधा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीद्वारे एकुण 450 आदिवासी नागरिकांची निवड करण्यात आली आहे. प्रस्तुत संशोधनात वर्णनात्मक संशोधन आराखडयाची निवड करण्यात आली आहे. अध्ययनात प्राप्त झालेल्या माहितीवरुन वारंवारीता व बहुलक काढण्यात आले. त्याचप्रमाणे माहितीच्या विश्लेषणाकरीता काई वर्ग मूल्य चाचणीचा वापर करण्यात आला. अध्ययनात प्राप्त परिणामांवरून असे निदर्शनास येते की अध्ययन क्षेत्रातील बहुतांश आदिवासी नागरिक मजूरी करतात व त्यांचे मासिक उत्पन्न रू. 5000 - 10000 इतके आहे. अध्ययन क्षेत्रातील बहुतांश आदिवासी नागरिकांचा खर्चाचे प्रमाण उत्पन्नाच्या 60 ते 69 टक्के असुन व्यवसायातुन मिळणारे उत्पन्न पर्याप्त नसल्याचे आढळले.