रजोनिवृत्ती काळातील स्त्रीयांच्या मानसिक स्वास्थ्यातील बदलांचा चिकित्सक अभ्यास - (विशेष संदर्भ चंद्रपूर जिल्हा)
DOI:
https://doi.org/10.7492/n084xz41Abstract
प्रत्येकच स्त्रीला तिच्या आयुष्यात रजोनिवृत्तीला सामोरे जावे लागते. अश्यावेळी स्त्रियांना बऱ्याच प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. नेमक्या कोणत्या समस्या तीव्रतेने जाणवतात, त्याचा त्यांच्या जीवनावर काय परिणाम होतो व त्यावेळी त्यांची मानसिक स्थिती कशी असते या बाबींचा अभ्यास करण्याच्या जिज्ञासेपोटीचंद्रपूर जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या स्त्रियांच्या संदर्भात प्रस्तुत विषयाची निवड संशोधनाकरिता केली आहे.प्रस्तुत संशोधनकार्यात स्त्रियांच्या मानसिक स्वास्थाच्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी सर्वेक्षण पद्धतीचा उपयोग करण्यात आला व एकूण रजोनिवृत्ती आलेल्या 300 स्त्रियांची न्यादर्श म्हणून निवड करण्यात आली. संकलित केलेल्या माहितीच्या विश्लेषणाकरिता काई वर्ग मुल्य चाचणीचा वापर करण्यात आला. संभाव्यता पातळी 0.05 निर्धारित करण्यात आली. संशोधनकार्यात प्राप्त झालेल्या परिणामांवरून असे निदर्शनास येते की, चंद्रपूर जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या बहुतांश स्त्रियांना रजोनिवृत्ती काळात झोपेशी संबधित समस्या जाणवतात, कधीकधी चिडचिड किंवा मूड स्विंग्स जाणवतात व वारंवार कोणत्याही कारणाशिवाय चिंता किंवा अस्वस्थता जाणविते.


