दैंनदिन ग्रंथालयीन कामकाजात इंटरनेटची (आंतरजाल) उपयोगीता
DOI:
https://doi.org/10.7492/py9n4561Abstract
आजचा काळ माहिती आणि तंत्रज्ञानाचा आहे, आणि या बदलत्या युगात ग्रंथालयांचे स्वरूपही पारंपारिक चौकटीतून बाहेर आले आहे. दैनंदिन ग्रंथालयीन कामकाज अधिक कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणवर होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयांची भूमिकाही झपाट्याने बदलत आहे. पारंपरिक ग्रंथालयीन सेवांबरोबरच आता डिजिटल सेवा अत्यावश्यक झाल्या आहेत. यामध्ये इंटरनेटचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो. इंटरनेटमुळे ग्रंथालयातील दैनंदिन कामकाज अधिक गतिमान, परिणामकारक आणि सोयीस्कर झाले आहे. ग्रंथालय व्यवस्थापनासाठी इंटरनेटचा वापर केल्याने ग्रंथसंचयन, वर्गीकरण, निर्गम व परतवणूक प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. ऑनलाईन कॅटलॉग (OPAC) प्रणालीमुळे वापरकर्ते घरबसल्या पुस्तकांची माहिती शोधू शकतात. यामुळे वेळ व श्रमाची बचत होते. वाचनालये आता ई-पुस्तके, ई-जर्नल्स, संशोधन निबंध, डेटाबेस इत्यादींच्या माध्यमातून वाचकांना अधिक माहितीपुरवठा करू शकतात. शैक्षणिक व संशोधन कार्यात इंटरनेटवरील माहिती उपयुक्त ठरते. इंटरनेटद्वारे ग्रंथालये आंतरराष्ट्रीय नेटवर्कशी जोडली जातात. विविध ग्रंथालयांतील माहिती, दस्तऐवज, साहित्य यांचा विनिमय शक्य होतो. हे संशोधक व अभ्यासकांसाठी फार मोलाचे आहे. ग्रंथपालांसाठीही प्रशिक्षण, वेबिनार्स, नवीन साहित्याची माहिती, जागतिक ग्रंथालयीन चळवळी इ. बाबतीत इंटरनेट मार्गदर्शक ठरते. यामुळे त्यांची व्यावसायिक कौशल्ये अधिक विकसित होतात. एकूणच, इंटरनेटचा समावेश केल्यामुळे ग्रंथालये केवळ पुस्तकांच्या संग्रहालयापुरती मर्यादित न राहता, माहिती केंद्रे बनली आहेत. दैनंदिन कामकाजात इंटरनेटचा वापर हे ग्रंथालयीन व्यवस्थापनाचे भविष्यातील अपरिहार्य अंग आहे.