मुक्त शैक्षणिक संसाधने: गरज व भारतातील प्रयत्न

Authors

  • सुनिल यशवंतराव देसले, डॉ. जगदीश राजाराम काळे Author

DOI:

https://doi.org/10.7492/nhsk5523

Abstract

भारतासारख्या देशाची वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि उच्च व तंत्र शिक्षण देणाऱ्या शासकीय शिक्षणसंस्थांची अत्यल्प संख्या खाजगी शिक्षणसंस्थांची भरमसाठ फी यामुळे उच्च शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 2021 च्या AISHE च्या अहवालानुसार फक्त 27% आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2035 पर्यंत हे प्रमाण 50% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी  मुक्त शैक्षणिक संसाधनांची भूमिका महत्वाची आहे. सहज, मोफत, व स्वतःच्या वेळेनुसार उपलब्धता तसेच जसेच्या तसे, रुपांतरण व दोन किंवा अधिक संसाधने एकत्रीकरणाची मुभा असल्याने उच्च शिक्षणात तसेच आजीवन अध्ययनासाठी मुक्त शैक्षणिक संसाधने महत्वाची आहेत. प्रस्तुत लेखात मुक्त शैक्षणिक संसाधनांची आवश्यकता, महत्व व भारतातील त्यासंबंधित झालेले प्रयत्न या बाबींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशद करण्यात आलेली आहे.

Downloads

Published

2011-2025

Issue

Section

Articles