मराठवाड्यातील कवींचे मराठी साहित्यातील योगदान

Authors

  • डॉ. अश्विनी अभिमन भामरे, Author

DOI:

https://doi.org/10.7492/2gpw2647

Abstract

मराठी साहित्यात कविता हा एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी साहित्यप्रकार आहे. या प्रकारात मराठवाड्यातील कवितेने देखील भरीव आणि संस्मरणीय योगदान दिले आहे. निजामी राजवटीपासून आधुनिक काळापर्यंतचा काव्यविकास हा एका प्रदीर्घ प्रवासाचा इतिहास आहे. दासगणू आणि दे.ल. महाजन यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आजच्या तरुण कवी दासू वैद्य, विलास पाटील यांच्यापर्यंत अविरतपणे सुरू आहे. मराठवाडा हा एक विशिष्ट भूप्रदेश असून त्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक वैशिष्ट्यांचा कवितेवर थेट परिणाम दिसून येतो. साठोत्तरी मराठी कवितेचा विचार करताना, या प्रदेशातील कवींच्या कविता त्यांच्या बोलीभाषा, कोरडवाहू जीवनशैली, स्थानिक संघर्ष, आणि दैनंदिन अनुभवांचा साक्षात्कार घडवतात.

Downloads

Published

2011-2025

Issue

Section

Articles