जळगाव जिल्ह्यातील महिलांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान
DOI:
https://doi.org/10.7492/pker1m92Abstract
स्वातंत्र्योत्तर काळात भारतात अनेक सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक बदल घडून आले, आणि या परिवर्तनाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला. जळगाव जिल्ह्यातील महिलांनीही या कालखंडात शिक्षणाच्या क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे. पारंपरिक बंधनांमधून बाहेर पडत त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि इतर महिलांसाठी आदर्श निर्माण केला. शिक्षिका, प्राचार्या, प्राध्यापिका, सामाजिक शिक्षण कार्यकर्त्या अशा विविध भूमिकांमधून त्यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांनी ग्रामीण भागातही शिक्षणाचा प्रसार घडवून आणला आणि मुलींना शाळेत आणण्यासाठी जनजागृती केली. शिक्षण हे स्त्री सबलीकरणाचे प्रमुख माध्यम आहे, हे त्या कृतीतून सिद्ध करत होत्या. त्यांच्या या कार्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक चित्र बदलले असून, नव्या पिढीला प्रेरणादायी वाटचाल करण्यासाठी योग्य दिशा मिळाली आहे.