मनोहर तल्हार यांच्या 'निःसंग' या कथासंग्रहाचा आशय वेध
DOI:
https://doi.org/10.7492/mp26fw53Abstract
मनोहर तल्हार हे साठोत्तरी काळातील एक महत्त्वाचे कथाकार होते. त्यांच्या समकालीन कथाकार म्हणून आपल्याला उद्धव शेळके, सखा कलाल, यादव, शंकरराव खरात, जी. ए. चित्रे, खानोलकर, कमल देसाई, विद्याधर पुंडलिक, शरदचंद्र चिरमुले, विजय तेंडुलकर आणि विजया राजाध्यक्ष ही महत्त्वाची नावे घेता येतात. विविध विषय घेऊन नवीन जोमाने व नवीन प्रेरणेने तत्कालीन कथाकार आपले कथा लेखन करत होते. मनोहर तल्हार यांनी समाज मनाबरोबरच व्यक्ती मनाचाही धागा अचूक हेरून आपले कथालेखन केले. त्यांनी जवळजवळ १५० च्या वर कथा लेखन केले आहे. कथालेखनाचा हा आवाका पाहता त्यांनी विविध विषय घेऊन कथालेखन केले हे स्पष्टच आहे.
Downloads
Published
2011-2025
Issue
Section
Articles


