महाराष्ट्रातील शासकीय जिल्हास्तरीय ग्रंथालयातील वाचन साहित्य संग्रह: एक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/4xsnqk36Abstract
प्रस्तुत लेखामध्ये संशोधकाने महाराष्ट्र राज्यातील जिल्हा शासकीय ग्रंथालयांमधील वाचनसाहित्य संग्रहाचा आढावा घेतला आहे. जिल्हा शासकीय एकूण ३५ ग्रंथालायांपैकी पैकी २८ ग्रंथालयांचा प्रतिसाद संशोधकास प्राप्त झाला आहे. तसेच प्रस्तुत लेखामध्ये जिल्हा शासकीय ग्रंथालयांना स्वतःची इमारत आहे किंवा नाही याबाबतचा आढवा देखील घेतला आहे. सार्वजनिक ग्रंथालय हे असे ग्रंथालय असते की, जे समाजामधील सर्वसामान्य व्यक्तींसाठी खुले असते. या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला विनामूल्य किंवा अत्यल्प शुल्कामध्ये वाचन, अभ्यास, संशोधन आणि माहिती प्राप्त करण्याची सुविधा दिली जाते. या जिल्हा शासकीय ग्रंथालयांच्या माध्यमातून ज्ञान आणि माहितीचा प्रसार करणे, सर्वच प्रकारच्या वाचकांमध्ये वाचनाची आवड आणि वाचनाची सवय निर्माण करणे, सांस्कृतिक विकास साधने आणि समाजामधील लोकांमध्ये माहितीविषयक साक्षरता निर्माण करण्याचे एक अत्यंत महत्वाचे व मोलाचे कार्य ही ग्रंथालये पार पडत असतात. या दृष्टीकोनातून प्रस्तुत संशोधनात्मक लेखामध्ये प्रतिसाद प्राप्त २८ ग्रंथालयांमधील वाचनसाहित्यसंग्रह व ग्रंथालयाची स्वतंत्र इमारत याविषयी आढावा घेतला आहे.


