रशिया - युक्रेन युद्ध कारणे आणि परिणाम

Authors

  • प्रा. डॉ. आर. एस. पवार Author

DOI:

https://doi.org/10.7492/h670wr38

Abstract

रशिया आणि युक्रेन यांच्यात फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरू आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युद्धाची घोषणा केली होती. रशिया-युक्रेन युध्द आणि आनुषंगिक आर्थिक निर्बंधाचा नकारात्मक परिणाम जागतिक पातळीवर अमेरिकेने युरोपियन राष्ट्रांच्या मदतीने रशियावर नको तेवढे निर्बंध लावले परिणाम रशिया-युक्रेन युध्दात झाला. युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष झेंलेन्स्की यांनी आपल्या भैागोलिक स्थितीचा फायदा घेत अमेरिकेला नाटोचे सदस्य बनवण्याची मागणी केली.यावरून पुतीन चिडले कारण युक्रेनच्या सीमा रशियाला मिळतात. नाटो देशांमध्ये एक करार आहे कि NATO च्या कोणत्याही एका देशावर हल्ला झाला तर NATO च्या सर्व सदस्यांनी त्याला स्वता:वर केलेला हल्ला समजला जाईल आणि लष्करी सामर्थ्याने तो परतून लावेल नाटोमध्ये सध्या ३० देश आहेत अमेरिकेने नाटोच्या माध्यमाने रशियाला वेढा घातला. परिणामी रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण करून आपल्या सीमारेषा शेजारील युक्रेनच्या प्रदेशांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न गेली वर्षभर सुरु आहे.युक्रेनच्या लष्करी कार्यवाहीचे नियोजन आणि संचालन करण्यासाठी युक्रेनला पाठींबा आणि मदत देण्याबाबतची पाश्चात्य रणनीती उत्तर अटलांटिक संस्थेचा इतर सिमावर्ती राष्टरांवर मजबूत पवित्रा आणि रशिया विरुध्द  व्यापक बहुराष्ट्रीय आर्थिक निर्बंध यामुळे रशिया आणि युक्रेन पुरस्कुत अमेरिका यांच्यातील कठोरता अधिक विनाशाकडे जाण्याची भीती जगभर निर्माण झाली.रशिया-युक्रेन युध्द आर्थिक निर्बंध याचा नकारात्मक परिणाम जगातील विविध भागात दिसून आला.ज्यामुळे एक वेगळी आव्हाने वाढली आहेत. अमेरिकेच्या निर्बंधाना नाटो सदस्यांनीच नाकारल्याने जागतिक मत विभागले गेले आहे.आर्थिक निर्बंधाच्या अनपेक्षित परिणामांचा आफ्रिका,आशिया,आणि लँटिन अमेरिकेतील आर्थिक दृष्ट्या कमी प्रगत देश आणि विकसनशील देशांकरिता मुत्सधी उपाय योजण्याची संसाधनीय अर्थव्यवस्था धोक्यात गेली आहे. युक्रेन ही जगातील अनेक देशांची ग्रँनरी आहे युक्रेन,रशिया,कझाकीस्थान,आणि रोमानिया यासारख्या देशातील गहू निर्यात करण्यासाठी रशियन ब्लँक सी हे सर्वात मोठे पोर्ट आहे हे युध्दामुळे रशियन बंदरातून बाहेर पडणाऱ्या सर्व उत्पादांवर मंजुरीचे नवीन नियमाने  जगात आर्थिक मंदी येण्याची भीती  अंतराष्ट्रीय  अभ्यासकांनी वर्तवली आहे.तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरत असलेल्या रशियन आक्रमणाने जगाची झोप उडवली आहे.मुळात रशियाला युक्रेनवर कब्जा करण्यास कसलेही स्वारस्य नसले तरी त्याने नाटो मध्ये सहभागी होवू नये हीच मुख्य अट आहे जी युक्रेनला मान्य नाही.या एकमेव कारणासाठी सध्या जगात अणूयुध्द होण्याची भीती निर्माण झाली आहे.”

Downloads

Published

2011-2025