जैवविविधतेने नटलेला नागझिरा वन्यजीव अभयारण्य : पर्यटन व स्थानिक लोकांचा विकास
DOI:
https://doi.org/10.7492/a87bdr06Abstract
“वनात भवति पर्जन्य: पर्जन्यात अन्नसंभव:।
अन्न्स्य संभवात संपद तस्माद् वाणिज्यवर्धनम्॥
वाणिज्यात विविधोद्योगा: तस्मात् सृष्टेनिरामय ।
एतत्सर्वमसाध्यं हि वृक्षसंवर्धनं विना ॥”
‘वृक्ष आणि पर्यावरण’ मानवी जीवन विकास, सजीव सृष्टी यांचे अटूट नाते आणि जीवनश्रृंखला सांगणाऱ्या या सुभाषितातून पर्यावरण आणि मानवी जीवन यांचे सहसंबंध स्पष्ट होतांना दिसते. याचे अस्तित्व मानवाकरिता वन, पर्यावरण व जीवनचक्राला फार महत्वाचे आहे. अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी, जीवनावश्यक गरजा- पूर्तीचा ऊर्जास्त्रोत तसेच सजीव सृष्टीचा रक्षणकर्ता, पालनकर्ता म्हणजे वृक्ष होय. वृक्ष हे पर्यावरणातील अभिन्न अंग असून पर्यावरणाचा समतोल राखण्यात मोलाची कामगिरी बजावतात. असेच कार्य नागझिरा वन्यजीव अभयारण्य व त्यातील जैवविविधता आपले पर्यावरण व मानवी विकास यांचा समतोल राखण्यास मदत करते. जैवविविधतेने नटलेले अभयारण्य विदर्भाची हिरवे फुफ्फुसे म्हणून ओळखली जातात.
या अभयारण्यामध्ये नानाविध प्रकारचे पक्षी, प्राणी, फुलपाखरे, फुले, बहूगुणी वनस्पती, सरपटणारे प्राणी यांचे प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. अश्या वैविध्यपूर्ण नटलेल्या वनसंपदामुळे मानव यांचा सुद्धा विकास होत आहे. यातून पर्यावरणाची कोणतीही हानी न पोहचता मानवाचा देखील श्वासत विकास व्हावा या उद्देशानातून निर्माण झालेले पर्यावरणीय पर्यटन हे मानवाचा आर्थिक विकास व पर्यावरणाचा समतोल राखण्यात मोलाची कामगिरी बजावतात. निसर्गाचे समतोल राखून मानवाचा विकास करणे हा पर्यावरणीय पर्यटनाचा मुख्य उद्देश आहे.