भावनिक बुद्धिमत्ता : संकल्पना, अर्थ, घटक व मानवी जीवनात व्यवस्थापन : एक दृष्टीकोन
DOI:
https://doi.org/10.7492/j8xa0w21Abstract
भावनिक बुद्धिमत्तेचा अर्थ व संकल्पना:
प्रस्तावना:
आजच्या धावपळीच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ बौद्धिक बुद्धिमत्ता (IQ) पुरेशी नाही, तर भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence – EQ) हेही तितकेच महत्त्वाचे घटक आहे. आपली आणि इतरांची भावना ओळखून त्या योग्य प्रकारे हाताळणे ही एक जीवनकला आहे. हीच कला म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता.भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखण्याची, समजण्याची, त्या योग्य रीतीने व्यक्त करण्याची व नियंत्रित करण्याची क्षमता. यामध्ये सहानुभूती, आत्मनियंत्रण, प्रेरणा, सामाजिक कौशल्ये आणि आत्मजाणीव या गोष्टींचा समावेश होतो.या संकल्पनेची मांडणी सर्वप्रथम पीटर सालोवे आणि जॉन मेयर यांनी केली, आणि नंतर डॅनियल गोल्मॅन यांनी तिला लोकप्रियता मिळवून दिली.