राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शिक्षकांचे प्रशिक्षण संदर्भात अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन विषयक दृष्टिकोनाचा अभ्यास

Authors

  • डॉ. सविता बाबुलाल जाधव Author

DOI:

https://doi.org/10.7492/52jz1796

Abstract

प्राचीन आणि सनातन भारतीय ज्ञान आणि विचारांची समृद्ध परंपरा लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे तयार करण्यात आले आहे. प्राचीन भारतात शिक्षणाचे ध्येय पूर्ण आत्मज्ञान आणि मोक्ष प्राप्ती होते. शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत सुधारणांच्या केंद्रस्थानी शिक्षक असला पाहिजे असे धोरण पूर्वीच्या अभ्यासक्रमात होते. मात्र नवीन शिक्षण विषयक धोरणाने शिक्षकाला सर्व पातळ्यांवर आपल्या समाजातील आदरणीय आणि आवश्यक सदस्य म्हणून पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून शिक्षक विषयक महत्त्वपूर्ण बाबींचा सविस्तर उल्लेख या धोरणात आहे. शिक्षकांना सक्षम करण्यासाठी तसेच सर्वोत्तम व बुद्धिमान व्यक्तींना सर्व पातळीवर शिक्षकी पेशात सामावून घेण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण संदर्भात अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन विषयक दृष्टिकोन याविषयी या शैक्षणिक धोरणाने मांडलेल्या मुद्द्यांचा आढावा सदर संशोधन पेपर मध्ये घेण्यात आला आहे.

Downloads

Published

2011-2025