राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020: कौशल्य विकसन आणि आव्हाने

Authors

  • डॉ. के. एस. खैरनार Author

DOI:

https://doi.org/10.7492/wqdc7q03

Abstract

डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेले नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे भविष्यकाळाचा वेध घेणारे शिक्षणक्षेत्रातील प्रभावी असे शैक्षणिक धोरण आहे. या शैक्षणिक धोरणाचा आकृतीबंध 5+3+3+4 असा असून शिक्षणाद्वारे कौशल्य निगडित रोजगारक्षम कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे हा आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळून त्यांना कौशल्य विकसनाची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक आव्हाने उभी आहेत. ही आव्हाने पेलण्याची इच्छाशक्ती असेल तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होईल यात शंका नाही.

Downloads

Published

2011-2025