माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अध्ययनशैली संदर्भात शैक्षणिक संपादनाचा अभ्यास

Authors

  • 1. प्रतिभा गुलाबराव पाटील , 2. डॉ. संजय जिभाऊ अहिरे Author

DOI:

https://doi.org/10.7492/za4s9f17

Keywords:

अध्ययनशैली, शैक्षणिक संपादन

Abstract

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षणाची संधी या तरतुदीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडीची सोय करून देण्यात आली आहे. व्यक्ती भेदाचे तत्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांच्या अभ्यासाच्या विशिष्ट पद्धतीप्रमाणे अध्ययन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनातून निश्चित केलेल्या तरतुदीला अनुसरून माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैली संदर्भात त्यांच्या शैक्षणिक संपादनाचा अभ्यास करणे संशोधकाला आवश्यक वाटले त्या दृष्टिकोनातून सदर संशोधन अभ्यास केलेला आहे.

Downloads

Published

2011-2025