शिक्षणशास्त्र पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांचा मुक्त शैक्षणिक संसाधने वापराबाबतचा अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/qxs3zq55Abstract
मुक्त शैक्षणिक संसाधने (OER) शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवत आहेत. हे संसाधने शिक्षक, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञाननिर्मिती आणि वितरण अधिक सुलभ व प्रभावी बनवत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने OER चा प्रभाव वाढत असून, शिक्षण सर्वांसाठी अधिक प्रवेशयोग्य आणि परवडणारे होत आहे. शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये मुक्त शैक्षणिक संसाधनांच्या वापराबाबतचा अभ्यास करण्यासाठी संरचित प्रश्नावलीचे विकसन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयांतील 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेशित 200 प्रशिक्षणार्थ्यांची सहेतुक नमुनानिवड पद्धतीने प्रतिसादक म्हणून निवड करून त्यांच्याकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. या संशोधनातून बी.एड. प्रशिक्षणार्थ्यांनी अभ्यासासाठी मुक्त शैक्षणिक संसाधनांचा वापर करतात, बहुतांश उपलब्ध मुक्त शैक्षणिक संसाधने उपक्रमांचा वापर करत नाहीत, NCERT चा सर्वाधिक वापर केलेला आहे, मुक्त शैक्षणिक संसाधने वापराचा हेतू क्रमाने प्रामुख्याने विषयाच्या नोट्स व असाइनमेंट तयार करण्यासाठी करतात, मुक्त शैक्षणिक संसाधने वापरताना सर्वात जास्त वेळा आशयाशी संबंधित चित्रे, तक्ते, सादरीकरणे, व्हिडीओ, ध्वनिफिती, पृष्ठे डाउनलोड करतात, मुक्त शैक्षणिक संसाधने शोधण्यासाठी प्रामुख्याने सर्च इंजिन व यु ट्युबचा वापर करतात हे प्रमुख निष्कर्ष आहेत.