माध्यमिक शाळेतील विज्ञान विषयातील सर्जनशीलता विद्यार्थ्यांना कोडींग प्रोग्राम द्वारे विकसन व परिणामकारकतेचा अभ्यास

Authors

  • 1. श्री. योगेश वसंतराव भाबड , 2. डॉ. नंदा गेमू वसावे , 3. डॉ. सुनिता नेमाडे Author

DOI:

https://doi.org/10.7492/jdbr6661

Abstract

प्रस्तुत संशोधनात माध्यमिक शाळेतील विज्ञान विषयातील सर्जनशीलता विद्यार्थ्यांना कोडींग प्रोग्राम द्वारे विकसन व परिणामकारकतेचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी प्रायोगिक संशोधन पद्धतीची निवड करण्यात आली होती. यासाठी सहेतुक नमुना निवड पद्धतीच्या आधारे माध्यमिक स्तरावरील 60 विद्यार्थ्यांना पूर्वचाचणी व उत्तर चाचणी देण्यात आली. पूर्वचाचणी देत असताना त्याचे मध्यमान प्रमाण विचलन या सांख्यिकीय तंत्राचा वापर केला. त्यानंतर उत्तर चाचणी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादावरून असे दिसून येते की नियंत्रित गटातील विद्यार्थ्यांना कोडींग प्रोग्राम पासून दूर ठेवून पारंपारिक पद्धतीने अध्यापन केले असता त्यांची विज्ञान विषयातील सर्जनशीलता ही विकसित झाली नाही.शहरी भागातील प्रायोगिक गटातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील सर्जनशीलता विकसित करण्यासाठी कृती उपक्रमांचा वापर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक सर्जनशीलता विकसित होते.

Downloads

Published

2011-2025